Mahila ST Pravas 50% Savalat
राज्य सरकारने महिला प्रवाशांना एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. यानुसार सर्व महिलांना एसटीने प्रवास करण्यासाठी आर्धे तिकीट द्यावे लागणार आहे. विचित्र महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या या योजनेची दिनांक 17.03.2023 पासून झाली आहे.
महिलांना एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत ही योजना दिनांक 17.03.2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या दररोज सरासरी 50 ते 55 लाख प्रवासी एसटीतून प्रवास करत असतात. एकूण प्रवाशांमध्ये अंदाजे 30% म्हणजेच 16 ते 17 लाख महिला प्रवासी एसटीने प्रवास करतात. सध्या बारा वर्षाखालील मुलांना आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाते. तसेच आता राज्यातील 75 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात शंभर टक्के सवलत मिळणार आहे.
शासनाने महिलांना 50 टक्के सवलत जाहीर केली परंतु काही अटीही आहेत याही जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. महिलांना एसटी प्रवासात हाफ तिकीट ने प्रवास करण्यासाठी काय अटी आहेत. हे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
महिला प्रवासासाठी शासनाची अट समजून घेण्यासाठी उदाहरणार्थ समजून घेऊया समजा, कराड ते सातारा जाण्यासाठी या अगोदर 50 रुपये तिकीट असेल तर आता महिलांना 25 रुपये तिकीट आणि शासनाचा कर यासोबत द्यावा लागेल शासनाचा कर 10 रुपये असेल. तर महिलांना 35 रुपये एवढे तिकीट आकारले जाईल. हे फक्त उदाहरण आहे यानुसार अर्ध्या तिकिटा बरोबर शासनाचे काही ठराविक कर असेल तो महिलांना प्रवास करताना द्यावा लागणार आहे.