Join our WhatsApp group

ट्रॅक्टर योजना 50% अनुदान, ऑनलाइन अर्ज सुरु

 

Tractor Anudan Yojana Maharashtra 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, mahadbt farmer या सरकारी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबवल्या जातात. महाडीबीटी फार्मर या पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सर्व कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी शासन अनुदान देत आहे tractor Yojana यासाठी फक्त महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. 

Mahadbt tractor Yojana साठी अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना राबवण्यासाठी महाडीबीटी फार्मर हे सरकारी पोर्टल आणले आहे. या सरकारी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकरण योजना, कृषी सिंचन योजना व फळबाग लागवड योजना या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांसाठी राज्य सरकार व केंद्रशासन दोन्हीकडून अनुदान शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होते. शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी त्यांची सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक पासबुक शेतीचा सातबारा आणि खाते उतारा व इतर आवश्यक कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात. यानंतर शेतकऱ्यांना पूर्वसंमती येते पूर्वसंमती आल्यानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर मिळणारी सर्व जीएसटी सहित बिले ऑनलाइन अपलोड करावी लागतात. यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासकीय अनुदान जमा केले जाते. 





महाडीबीटी ट्रॅक्टर योजना साठी अनुदान किती दिले जाते? 

महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटका खाली योजना राबवली जाते. यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना शासकीय अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी  45% ते 55 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. 

👇👇👇



Post a Comment

Previous Post Next Post