50 Hajar Anudan Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी शासन निर्णय आला आहे. सन 2022 23 या आर्थिक वर्षात 50000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान योजनेअंतर्गत मजूर निधी पैकी रुपये 740.65 कोटी रुपये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना या योजनेअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे. असा शासन निर्णय आला आहे.
पन्नास हजार अनुदान योजनेची पाचवी यादी
शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान योजनेसाठी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येत आहे. या योजनेच्या आतापर्यंत चार याद्या प्रकाशित झाले आहेत. या याद्या मधील पात्र शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम खात्यात जमा झाले आहे. जे शेतकरी योजनेसाठी पात्र असूनही त्यांचे नाव आले नव्हते त्या शेतकऱ्यांची पाचवी यादी आता जाहीर झाले आहे ही यादी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये किंवा कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन पाहायला मिळेल.