Bhunaksha Maharashtra : jaminicha nakasha जमिनीचा नकाशा आता ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर पाहू शकता तेही अगदी मोफत. शेत जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी तुम्हाला फक्त शेत जमिनीचा गट नंबर टाकावा लागेल. शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन सातबारा आणि खाते उतारा काढला असेल परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने जमिनीचा नकाशाही पाहता येतो हे माहीत नाही आज आपण याचीच माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनवले आहे त्याचे नाव
BhuNaksha
हे आहे. या पोर्टलवर तुम्ही तुमच्या जमिनीचा फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहू शकता तसेच तुमच्या गावातील सर्व जमिनीचे गट नंबर टाकून तुम्ही तुमच्या शेजारच्या जमिनीचा नकाशा ही पाहू शकता. अनेक वेळा आपली जमीन कशी आहे. याविषयी शेतकऱ्यांना शंका वाटू शकते तसेच जमिनीची मोजणी करण्यासाठी ही शेत जमिनीचा नकाशा चा उपयोग होतो.महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्रातील सर्व जमिनीचे नकाशे ऑनलाईन पाहता येतात.
या वेबसाईटवर जमिनीचे नकाशे पाहता येतात.
तुम्ही फक्त जमिनीचा गट नंबर टाकून नकाशा पाहू शकता.
Tags:
Shet Jaminicha Nakasha