आरोग्य विभाग भरती जिल्हा उस्मानाबाद
Osmanabad नमस्कार मित्रांनो या ब्लॉगवर नवनवीन सरकारी नोकऱ्यांची माहिती दिली जाते. आज आपण उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये निघालेल्या भरतीची माहिती घेणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 12 विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाले आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद उस्मानाबाद भरती
एकूण रिक्त जागा 12
पदाचे नाव - फिजिओथेरपीस्ट, लेखापाल, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत आरोग्य तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, सर्जन.
शैक्षणिक पात्रता - विविध पदांची शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांना पाच वर्षे सूट
परीक्षा शुल्क- 150 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपये.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023