E shram card holders 3000 rs pension
नमस्कार मित्रांनो, सर्व श्रम कार्डधारकांना केंद्र सरकार मार्फत तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा? पात्रता काय असेल? सर्व माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत.
ई श्रम कार्ड ही केंद्र सरकारची योजना आहे, देशातील सर्व असंघटित कामगारांची नोंदणी श्रम कार्ड पोर्टलवर होते. देशातील सर्व प्रकारचे कामगार, आणि स्वयंरोजगार करणारे छोटे व्यवसायीक आणि मजूर यांची नोंदणी श्रम कार्ड पोर्टलवर होत आहे. सर्व श्रम कार्ड धारकांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत तीन हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे. या पेन्शन योजनेसाठी श्रम कार्ड धारकाचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच श्रम कार्ड धारकाची मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये पेक्षा जास्त नसावे. वयाच्या साठ वर्षांनंतर या योजनेत समावेश झालेल्या सर्व श्रम कार्ड धारक कामगारांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. या पेन्शन योजनेसाठी श्रम कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर टेन्शन साठी नोंदणी केली जाते.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत सर्व श्रम कार्डधारकांना महिना तीन हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे. श्रम कार्डधारकांनाही पेन्शन वयाच्या साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. यासाठी श्रम कार्डधारकांना या योजनेमध्ये नाव नोंदवावी लागणार आहे श्रम काढताना पेन्शन घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे नोंदणीच्या बटनावर क्लिक करावे लागेल. पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता.