दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी स्कूटर पुरवणे यासाठी आर्थिक सहाय्य देणे
सातारा : नमस्कार मित्रांनो, सातारा जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्याकडून दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी स्कूटर पुरवणे यासाठी आर्थिक सहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण देत आहोत.
दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत तीन चाकी स्कूटर पुरवणे यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यासाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो. अर्जाचा नमुना पीडीएफ स्वरूपात खाली लिंक देण्यात आली आहे. हा अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज तालुकास्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये सादर करावा.
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असले बाबत सक्षम अधिकाऱ्याचा दाखला.
अर्जदार व त्याचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचा दाखला.
लाभार्थी स्थानिक रहिवासी असले बाबतचा दाखला.
लाभार्थी 18 ते 50 वयोगटातील असावा. जन्म तारखेचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स सत्यप्रत
आधार कार्ड ची सत्यप्रत