कडबा कुट्टी साठी 100% अनुदान, जिल्हा परिषद योजनांचे अर्ज सुरु

 

Jilha Parishad Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे. परंतु त्यांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. आजच्या लेखामध्ये आपण जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या योजनेची माहिती घेणार आहोत. शेतकऱ्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत अनेक योजना चालवले जातात. यामध्ये शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी तसेच इतर कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाते. 


कडबा कुट्टी साठी अनुदान योजना

शेतकरी मित्रांनो तुम्ही पशुपालन व्यवसाय करत असाल तर कडबा कुट्टी यंत्र तुमच्यासाठी अतिशय उपयोगी यंत्र असते. जशी यंत्र अवजारांची मागणी वाढली आहे तसेच त्यांच्या किमती वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजारे खरेदी करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद मार्फत ही काही योजना चालवल्या जातात यामध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारची कृषी यंत्र अवजारे दिले जातात. शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत रोटावेटर, पीव्हीसी पाईप, डिझेल इंजिन, सायकल कोळपे, कडबा कुट्टी, तसेच विविध कृषी उत्पन्न दिले जातात. 


कडबा कुट्टी साठी अर्ज पीडीएफ

अर्ज कोठे करावा 

शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत काही योजना चालवले जातात या योजनांचे अर्ज तालुकास्तरावर पंचायत समितीमध्ये भरावे लागतात. तसेच विविध योजनांची माहिती ही पंचायत समितीमध्ये दिली जाते. पंचायत समितीमध्ये तुम्हाला या योजनांचे अर्ज तसेच कोणकोणती का आवश्यक कागदपत्रे असतात याची सर्व माहिती मिळू शकते तसेच योजनांची अंमलबजावणी ही पंचायत समिती पूर्ण होते. तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाला भेट घ्यावी लागेल.


आवश्यक कागदपत्रे 

या योजनेसाठी मागासवर्गीय शेतकरी पात्र असतात. त्यामुळे त्यांचा जातीचा दाखला, विहित नमुन्यातील अर्ज, रेशनिंग कार्ड ची झेरॉक्स, एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला, जन्मतारखेचा पुरावा, बँक पासबुक सत्यप्रत, आधार कार्ड ची सत्यप्रत, इत्यादी कागदपत्र आवश्यक असतात.




Post a Comment

Previous Post Next Post