Kanda Anudan Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा अनुदानासंदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची घोषणा केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान दोनशे क्विंटल च्या मर्यादेत मिळणार आहे परंतु मित्रांनो हे अनुदान मिळण्यासाठी शासनाने पीक पेरायची अट लावली होती. परंतु महाराष्ट्रात असे बरेच शेतकरी पात्र असूनही या अटीमुळे वंचित राहण्याची शक्यता होती. यामुळे शासनाने पीक पेऱ्याची अट रद्द केली आहे.
शिवाय कांदा अनुदानासाठी आवश्यक अर्जाच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. कांदा अनुदान मिळण्यासाठी आधी सरकारने 20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत शेतकऱ्यांना दिली होती परंतु आता यामध्ये वाढ करण्यात आले आहे आता शेतकरी 30 एप्रिल पर्यंत कांदा अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.