लेक लाडकी योजना, प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये

 

Lek Ladali Yojana Maharashtra

राज्य सरकारने लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात जाहीर केले आहे या योजनेमध्ये पिवळे रेशन कार्ड व केशरी रेशन कार्ड धारक मुलींना वयाच्या अठराव्या वर्षी 75 हजार रुपये मिळणार आहेत.


राज्य शासन मुलींच्या सक्षमीकरणासाठी नवनवीन योजना राबवत आहे. शासनाने जाहीर केलेला बजेटमध्ये लेक लाडकी योजना घोषित केले आहे. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, मुलगी पहिलीत गेल्यानंतर चार हजार रुपये, सहावीत गेल्यानंतर सहा हजार रुपये, आणि मुलगी अकरावीत केल्यानंतर आठ हजार रुपये मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये मिळणार आहेत. शासन महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत आहेत. लेक लाडकी या योजनेतून मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा अधिकृत शासन निर्णय अजून आलेला नाही परंतु शासनाने जाहीर केल्यानुसार ही योजना लवकरच अमलात येणार आहे. या योजनेतून गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार केशरी रेशन कार्डधारक व पिवळे रेशन कार्डधारक असणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 


या योजनेचा अधिकृत शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवर याची माहिती देणारच आहोत. आपण आपल्या वेबसाईटवर नेहमीच शासनाच्या नवनवीन योजना यांची माहिती देत आहोत. लेक लाडली ही योजना मुलींसाठी अतिशय उपयुक्त योजना आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करावी. 

Post a Comment

Previous Post Next Post