Lekh ladki Yojana - मुलीच्या जन्मानंतर सरकार देणार एक लाख रुपये, लेक लाडकी योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्या

Lek Ladaki Yojana Maharashtra


मुलींसाठी सरकारी योजना : शासन मुली व महिलांसाठी खूप चांगल्या योजना राबवत आहे. मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना अशा योजना सुरू आहेत. या योजनांबरोबरच आता सरकार लेक लाडकी ही योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत अनेक कुटुंबातील मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे. लेक लाडकी ही योजना राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा हेतू आहे. 


मित्रांनो लेक लाडकी या योजनेमध्ये ज्या पालकांना फक्त मुली आहेत अशा पालकांना मुलींच्या नावाने सरकार आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे मुलींच्या लग्नाचा खर्च शिक्षणाचा खर्च तसेच पालन पोषणाचा खर्च केला जाणार आहे. 


लेक लाडकी या योजनेमध्ये मुलीला पहिली चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये, आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर सरकारकडून 75 हजार रुपये असे अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण चार टप्प्यात 98 हजार रुपये एवढी रक्कम मुलींना देण्यात येणार आहे. 


आवश्यक अटी

अर्ज करणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे
अर्ज करणाऱ्या मुलीकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असले पाहिजे.


आवश्यक कागदपत्रे

अर्ज करणाऱ्या मुलीचे आधार कार्ड
अर्ज करणाऱ्या मुलीचे किंवा तिच्या आई-वडिलांचे बँक पासबुक
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
रहिवासी दाखला
कुटुंबाचे केसरी किंवा रेशन कार्ड झेरॉक्स

Post a Comment

Previous Post Next Post