नमस्कार मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजनांमध्ये एक मुलगी असेल तर तिच्या नावे पन्नास हजार रुपये मिळतात यासाठी अर्ज कसा करावा ? याची माहिती या पोस्टमध्ये दिले आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र राज्यातील अतिशय उल्लेखनीय योजना, मुलींचा जन्मदर वाढवा, तसेच मुलींचे आर्थिक स्थिती उंच व्हावी यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.
अनेक लोकांना या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असतो. परंतु अर्ज कसा करावा आणि कोठे करावा याची माहिती नसते त्यामुळे इच्छा असून सुद्धा अनेकजण या योजनेमध्ये अजूनही सामील नाहीत. खाली आम्ही अर्जाचा नमुना दिला आहे.
योजनेच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती
या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक मुलगी किंवा दोन मुली नंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या चा दाखला आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतो.
मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये खाते उघडून योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचे संपूर्ण कार्यवाही तसेच अर्ज तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये मिळतील. अंगणवाडी सेविका तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण मदत करतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्या.