मोफत गाय गोठा योजना, महत्त्वाचा बदल नवीन शासन निर्णय पहा

 

Sharad Pawar gram samriddhi Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना गाई/ म्हशी गोठा उभारण्यासाठी शासनामार्फत 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. या शासन निर्णयानुसार या योजनेत महत्त्वाचे बदलही झाले आहेत. शरद पवार ग्राम समृद्धी योजने मध्ये कोणता बदल झाला आहे हे या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना | गाय गोठा उभारण्यासाठी 100 टक्के अनुदान नवीन शासन निर्णय. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्य योजना राबविण्यात शासन मान्यता देण्यात आले आहे. या शासन निर्णयात गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोटा बांधण्याबाबत शासकीय अनुदान दिले जाते. त्यानुसार गोट्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहील असे नमूद करण्यात आले आहे. बँकेचे कर्ज घेऊन किंवा पशुसंवर्धन व अन्य विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या गाई, म्हशी यांना टॅगिंग करण्यात येते. तथापि स्वखर्चाने घेतलेल्या जनावरांना  टॅगिंग नसल्याने गोठे देणे संदर्भात अडचणी निर्माण होतात. लाभार्थी पात्र असून देखील या योजनेत लाभापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी आता नवीन शासन निर्णय आला आहे.


गोट्याच्या प्रस्तावासोबत जनावरांची टेकिंग आवश्यक या ऐवजी संबंधित ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करून लाभार्थ्याकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी पंचनामा करताना ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणीही एक हजर असणे आवश्यक राहील. 

Post a Comment

Previous Post Next Post