मार्च 2023 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी या दहा जिल्ह्यांना मिळणार 27 कोटी रुपये
शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास एका हंगामात एका वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अव्ययी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णया नुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण 27 कोटी 18 लाख 52 हजार रुपये इतका निधी जिल्हा निहाय वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
Tags:
shetkari yojana