या महिलांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये अनुदान जमा Pradhanmantri Matru Vandana Yojana

Pradhanmantri Matru Vandana Yojana 2023 Information in Marathi 

नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेअंतर्गत महिलांना पाच हजार रुपये दिले जातात. सदर योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या हिस्सातून हा निधी महिलांना दिला जातो. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40% आर्थिक सहभाग आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2023 या दिवशी शासन निर्णय आला आहे यामध्ये सन 2022 23 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री मातृ वंदना या योजनेच्या सर्वसाधारण घटकाचा राज्य हिश्याचा 40% निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय जाहीर झाला आहे.  

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेमध्ये गरोदर महिलांना 6 हजार रुपये दिले जातात. गरोदर महिलांना पोषक आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्व गरोदर महिलांना 6 हजार रुपयांची मदत दिली जाते.  


देशातील गरोदर महिला आणि स्तनदा महिला यांची काळजी घेता यावी यासाठी सरकार या महिलांना पाच हजार रुपये देते. या योजनेअंतर्गत गरोदरपणात आणि स्तनपान करण्याच्या काळात महिलांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये 5000/- रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात येते. 


झालेला बदल 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत महिलांना गरोदरपणात आणि स्तनपान करावयाच्या कालावधीत त्यांना पाच हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये रोख दिले जातात. ही योजना फक्त पहिला मुलाच्या जन्माच्या वेळी लागू होते. आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतरही महिलांना पाच हजार रुपये मिळणार आहेत.


प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची नोंदणी कशी करावी 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या सरकारी दवाखाना मध्ये जाऊन नोंदणी करू शकता. याबाबत सर्व माहिती सरकारी दवाखान्यातील आशा सेविका देतात. गरोदर पणात आणि बाळ झाल्यानंतर सर्व काळजी सरकार घेते यासाठी आशा सेविकांची नेमणूक करण्यात येते. आशा सेविका तुम्हाला याबाबत सर्व मार्गदर्शन करतील.



Post a Comment

Previous Post Next Post