शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत काही योजना चालवले जातात या योजनांचे अर्ज तालुकास्तरावर पंचायत समितीमध्ये भरावे लागतात. तसेच विविध योजनांची माहिती ही पंचायत समितीमध्ये दिली जाते. पंचायत समितीमध्ये तुम्हाला या योजनांचे अर्ज तसेच कोणकोणती का आवश्यक कागदपत्रे असतात याची सर्व माहिती मिळू शकते तसेच योजनांची अंमलबजावणी ही पंचायत समिती पूर्ण होते.
या योजनेसाठी मागासवर्गीय शेतकरी पात्र असतात. त्यामुळे त्यांचा जातीचा दाखला, विहित नमुन्यातील अर्ज, रेशनिंग कार्ड ची झेरॉक्स, एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला, जन्मतारखेचा पुरावा, बँक पासबुक सत्यप्रत, आधार कार्ड ची सत्यप्रत, इत्यादी कागदपत्र आवश्यक असतात.
Tags:
jilha parikshad yojana