अंगणवाडी सेविका भरतीमध्ये महत्त्वाचा बदल नवीन शासन निर्णय पहा

 

Anganwadi Sevika Bharati 2023 New GR | Shasan  Nirnay 2 May 2023

नमस्कार मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती मध्ये सुधारणा करणे बाबत शासन निर्णय दिनांक 2 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका भरती वर कोर्टाने स्थगिती उठवल्यानंतरचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे.


शासन निर्णय 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मिनी, अंगणवाडी सेवका, व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात शासन निर्णयान्वये अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. या अटी शर्ती मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

1. मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस जर ती दहावी उत्तीर्ण असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी. तथापि नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असल्यास अथवा एखाद्या मिनी अंगणवाडी केंद्रातील मिनी अंगणवाडी सेविकेचे पद सेवानिवृत्तीमुळे राजीनामामुळे अथवा अन्य कारणामुळे रिक्त झाल्यास त्या ठिकाणी नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविके करता शैक्षणिक आरहता इयत्ता बारावी उत्तीर्ण राहील.  


शासन निर्णय पहा


Post a Comment

Previous Post Next Post