Anganwadi sevika Pagarwad - अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये मानधन वाढवून मिळणार आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते. मुंबईतील
आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. बऱ्याच वर्षापासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही यासह अनेक मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरू केले होते.
अंगणवाडी सेवकांचे पगार तब्बल एवढ्या रुपयांनी वाढले.
अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना ही सुरू केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्न बाबत तातडीची बैठक घेण्यात आली. तसेच अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन 1000 रुपयांनी वाढवले जाणार आहे.