वयवर्ष 18 ते 40 वय असणाऱ्या नागरिकांना फक्त २१० रुपयांमध्ये 5 हजार रुपये पेन्शन, Atal Pension Yojana

 

Atal Pension Yojana 

अटल पेन्शन योजना : महिना 5 हजार रुपये पेन्शन 

नमस्कार मित्रांनो, तुमचे वय जर 18 ते 40 वय असेल तर, तुम्हाला 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. आपल्या देशामध्ये अनेक लोक हे गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेत, हे लोक रोजगार, व्यवसाय किंवा खाजगी नोकरी करत असतात. उतारवयात जेव्हा हे लोक काम करू शकत नाहीत तेव्हा त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. याचा विचार करून केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना आणली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर, वयाच्या ६० नंतर, तुम्हाला दरमहा १००० ते ५००० रुपये पेन्शनची सुविधा मिळते. एवढेच नाही तर पती-पत्नी दोघांनीही या योजनेत स्वतंत्रपणे गुंतवणूक केल्यास त्यांना मासिक 10,000 रुपये पेन्शनचा लाभ मिळू शकतो.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत स्वतःची नोंदणी केली तर त्याला दरमहा केवळ 210 रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या ६० वर्षांनंतर त्यांना दरमहा ५००० रुपये पेन्शनचा लाभ मिळेल. दुसरीकडे, जर पत्नीने वयाच्या 39 व्या वर्षीही या योजनेत गुंतवणूक केली तर तिलाही 5000 रुपये पेन्शनचा लाभ मिळेल. म्हणजे पती-पत्नीचे एकूण उत्पन्न 10 हजार रुपये असेल. 40 वर्षांवरील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.


Post a Comment

Previous Post Next Post