ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अतिशय महत्त्वाची बातमी आहे. इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक निकाल 2023 जाहीर करण्यात आला आहे. Gramin Dak Sevak result 2023 पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाईट www.indiapost.gov.in वर उपलब्ध आहे.
ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल समजू शकणार आहे. पोस्ट विभागाने अकरा मार्च 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केला आहे.
पोस्ट ऑफिस निकाल यादी डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्यामध्ये विविध 23 मंडळामध्ये एकूण 40889 ग्रामीण डाक सेवकांच्या भरतीसाठी जीडीएस निकाल 2023 घोषित करण्यात आला आहे. ग्रामीण डाक सेवक भरती उमेदवारांच्या फक्त दहावीच्या मार्क्स वर आधारित होती. यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात आली नव्हती.