आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 500 रुपये विद्यावेतन

 

ITI Students get 500 rs Vidyavetan | Latest News

येत्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील आयटीआय विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहे. आयटीआय मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आता गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विद्या वेतनही मिळणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य शिकून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा या उद्देशाने तसेच आयटीआय क्षेत्रात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी ही घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. 


तसेच राज्यातील तरुणांना करिअर विषयक संधीची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे.


युवकांसाठी भविष्याची विविध नवीन शेतीचे खुली भावगीत नवनवीन अभ्यासक्रम स्किल्स त्यांना माहिती व्हावीत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे यासाठी राज्यात 6 जून पर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.



बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती लगेच अर्ज करा.

Post a Comment

Previous Post Next Post