कुसुम सोलर योजना अर्ज
शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेतून शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलर कृषी पंप मिळतो. या योजनेसाठी दिनांक 17 मे 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. पीएम कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार ३, 5 व 7.5 HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप मिळणार आहेत.
खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या एकूण खर्चाच्या फक्त दहा टक्के रक्कम स्वतः खर्च करावी लागते तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रक्कम व खर्चातून करावे लागते. वरील जाहिरातीमध्ये एचपी नुसार किती रक्कम गुंतवावी लागते ते दिले गेले आहे.
कुसुम सोलर योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय लोकप्रिय योजना आहे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेतून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप शेतामध्ये लावण्यासाठी 90% ते 95 टक्के एवढे अनुदान मिळते यामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंपावरील खर्च कमी होऊन उत्पन्न वाढू शकते.
Tags:
kusum solar pump yojana