कुसुम सोलर पंप योजना 2 ऑनलाईन अर्ज सुरु आहेत 90% अनुदान मिळणार

 

कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत शेतामध्ये सोलर पंप लावण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. सध्या 3 HP , 5 HP आणि 7.5 HP सोलर पंप साठी ऑनलाईन अर्ज करता येतो. सोलर पंप लावल्याने शेतकऱ्यांना वीज बिलापासून कायमची मुक्तता मिळते. आणि शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. 


कुसुम सोलर पंप योजना

कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत सरकारने १९ जिल्हे निवडले आहेत. यामध्ये तुमचा जिल्हा असल्यास तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते. प्रधानमंत्री कुसुम  योजनांतर्गत 100000 सौर पंप योजना सुरू झाले आहे. यासाठी केंद्र शासनाकडून अद्याप पुरवठादार कंपन्या व दर अंतिम झालेले नाहीत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मागील वर्षाची पुरवठादार मागील वर्षाच्या दराने सर पंप पुरविण्यास तयार असतील अशा पुरवठादारांकडून दोन हजार 750 सौर पंपासाठी प्रथम आलेल्या अर्जदारास प्राधान्य देऊन त्याची कार्यवाही सुरू आहे.


केंद्र शासनाकडून यावर्षीचे पुरवठादार कंपन्या व दर आल्यानंतरच या पुरवठा दारांना जिल्हानिहाय कोटा वाटप केल्यानंतर योजनेचे अपेक्षित कार्यवाही सुरू होईल. तोपर्यंत अर्जदाराची प्राथमिक माहिती आणि मोबाईल नंबर नोंदणी करण्यात येत आहे.


केंद्र शासनाकडून सौर पंप पुरवठादार व दर ठरवून मिळाले व राज्य शासनाचे सुकाणू समितीकडून जिल्हानिहाय पुरवठादारास वाटप झाल्यानंतर अर्जदारांना प्राधान्यकमानुसार एसएमएस पाठवण्यात येतील. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्वीकारणे, कंपनी निवडणे आणि सौर पंप स्थापित करणे या बाबी शक्य होतील.👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post