बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबुद्ध शेतकरी यांच्या जमिनीत ओलावा वाढवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवा या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आखण्यात आले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नवीन विहीर खुदाई व बांधकाम, वीजजोडणी आकार, विद्युत पंपसंच खरेदी, सूक्ष्म सिंचन संच, आणि इनवेल बोरिंग या घटकांसाठी अनुदान दिले जाते.
या योजनांमध्ये अनुदान किती दिले जाते हे पाहूया
नवीन विहीर खुदाई व बांधकाम २५००००/
विज जोडणी आकार १००००/-
विद्युत पंप संच खरेदी २००००/-
सूक्ष्म सिंचन संच
तुषार सिंचन संच २५०००/-
ठिबक सिंचन संच ५००००/-
इनवेल बोरिंग २००००/-
या योजनेअंतर्गत जुनी दुरुस्ती साठी अनुदान दिले जाते. सुनील दुरुस्तीसाठी ५००००/- अनुदान दिले जाते.
लाभार्थी पात्रतेचे निकष
लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध शेतकरी असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकांचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी किमान ०.४० हे शेत जमीन असणे आवश्यक.
ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान ०.२० हे जमीन असणे आवश्यक
आधार कार्ड बँक पासबुक असणे आवश्यक आहे
अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावी