PM Kisan Yojana installment
नमस्कार शेतकरी, पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना मागील काही दिवसापासून पीएम किसान योजनेचे हप्ते मिळत नाहीत. अशा शेतकऱ्यांनी काय करावे जेणेकरून पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो.
पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचे आतापर्यंत 13 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता दोन हजार रुपये चा पुढील 14 वा हप्ता काही दिवसातच मिळणार आहे. हा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे ते जाणून घेऊया.
1. आधार ई केवायसी - जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत परंतु अजूनही आधार केवायसी झालेले नाही, त्या शेतकऱ्यानी आधार इ केवायसी पूर्ण करून घ्यावी.
2. आधार बँक लिंकिंग - तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड ला लिंक करून घेणे आवश्यक आहे. तुमची बँक खाते आधार कार्ड ला लिंक खात नसल्यास पोस्टाचे बँक खाते उघडून घ्यावे.
3. लँड सिडींग - ज्या शेतकऱ्यांचे बेनिफिशरी स्टेटस मध्ये लँड सिडिंग नो येते, त्या शेतकऱ्यांनी फिजिकल वेरिफिकेशन करणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या शेतीचा सातबारा खाते उतारा तुमचे रेशन कार्ड आधार कार्ड अशी सर्व डॉक्युमेंट तहसीलदार कार्यालयामध्ये पीएम किसान योजना विभागात द्यावे लागणार आहेत. तुम्ही कागदपत्रे दिल्यानंतर तेथे लँड सिडिंग येस येईल.