Jilha Parishad Yojana Mofat Zerox Machine Anudan Yojana Arj / Form PDF Download
झेरॉक्स मशीन योजना अर्ज
सातारा जिल्हा परिषद 20 टक्के निधीतून मागासवर्गीय लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे ही योजना चालवली जाते. या योजनेतून मागासवर्गीय लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाते. मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये ही योजना चालवली जाते. या पोस्टमध्ये तुम्हाला सातारा जिल्हा परिषदेमार्फत सुरू असणाऱ्या मोफत झेरॉक्स मशीन योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे तसेच अर्ज ही उपलब्ध होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
वर लिंक मध्ये दिल्या प्रमाणे विहित नमुन्यातील अर्ज
मागासवर्गीय असलेबाबतचा जातीचा दाखला
एक लाख रुपये पर्यंत उत्पन्नाचा दाखला
रेशनिंग कार्ड ची झेरॉक्स
लाभार्थी 18 ते 65 वयोगटातील असावा
लाभार्थी निवडी बाबतचा ग्रामपंचायत चा ग्रामसभेचा किंवा मासिक सभेचा ठराव
लाईट बिल
लाभार्थी गरजू पात्र व बेरोजगार असले बाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
बँकेच्या पासबुकची सत्यप्रत
आधार कार्ड ची सत्यप्रत
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरून तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून पंचायती समिती कार्यालयामध्ये समाज कल्याण विभागांमध्ये सादर करावा.