भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शासकीय अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जात आहे. तुम्ही या योजनेत भाग घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला येथे संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना राज्य सरकार मार्फत नव्याने सुरू करण्यात आले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शासकीय अनुदान दिले जाते. ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्यावर्षी 50% अनुदान, दुसऱ्या वर्षी 30% अनुदान आणि तिसर्या वर्षी 20% अनुदान असे शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी कमीत कमी 20 गुंठे क्षेत्र असावे. कोकण भागामध्ये शेतकऱ्यांकडे कमीत कमी 10 गुंठे क्षेत्र असावे. अल्प भूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी, आणि महिला शेतकरी यांना या योजनेमध्ये प्राधान्य आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणी करता 100% अनुदान देण्यात येते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ऑनलाईन अर्ज
या योजेनेचा ऑनलाईन अर्ज महा डीबीटी पोर्टल वर फार्मर लॉगीन ने करता येतो. महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. या पोर्टल वर अर्ज केल्यानंतर कृषी सहायक तुमच्याशी संपर्क करून तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
👇👇👇
महाडीबीटी पोर्टल फार्मर (Maha Dbt Farmer)
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी ही अधिकृत वेबसाईट आणली आहे. या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी सर्व शासकीय योजना असतात. शेतकरी एकाच वेळी अनेक योजनांसाठी ही अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांना असणाऱ्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना आणि फळ लागवड योजना अशा विविध योजना नेहमी सुरू असतात. शेतकरी एकाच वेळी अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांना अर्ज करताना ऑनलाईन अर्ज फी फक्त 23 रुपये 60 पैसे भरावी लागते. शेतकरी योजनांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. ज्या शेतकऱ्यांची निवड योजनेसाठी होते त्या शेतकऱ्याने पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे अपलोड करावे लागतात. यानंतर शेतकऱ्यांना कृषी यंत्र आणि साहित्याच्या खरेदीसाठी पूर्वसंमती येते यानंतर शेतकऱ्यांनी खरेदी केल्यानंतर बिले अपलोड करावे लागतात आणि मग नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग केली जाते.