लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात, तुम्हाला मिळाला का येथें चेक करा

 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये पंधराशे दिले जातात. ज्या योजनेस आता एक वर्ष झाले आहे. मागील जून महिन्याचा हप्ता महिलांना डीबीटी  माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये काल वितरित करण्यात आला आहे. अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. https://ladakibahin.maharashtra.gov.in/


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - 

 महाराष्ट्र राज्य शासनाची महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वकांक्षी योजना आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी शासनामार्फत ही योजना मागील एक वर्षापासून सुरू आहे. या आर्थिक मदतीचा महिलांना त्यांच्या संसारामध्ये, आर्थिक अडचणी मध्ये उपयोग होत आहे. तसेच काही महिला या पैशातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यातून राज्याच्या आर्थिक विकासाकडे वाटचाल होत आहे. 


जून महिन्याचा हप्ता वितरित दिनांक 5 जुलै 2025 पासून लाडकी बहिणींना जून महिन्याचा हप्ता वितरित झाला आहे. तुम्हाला हप्ता मिळाला की नाही हे तुम्ही तसेच तपासू शकता ? तर यासाठी तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर म्हणजेच ई सेवा केंद्र मध्ये जाऊन आधार कार्डवर चेक करू शकता तसेच तुमच्या बँक मध्ये जाऊनही पैसे चेक करू शकता आणि काढू शकता. अनेक महिलांना पैसे जमा झाल्याचे मेसेज त्वरित येतात.  


या महिलांचे हप्ते बंद झाले - अनेक सरकारी कर्मचारी महिला या योजनेतून लाभ घेत असल्याचे शासनास निदर्शनास आले. अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे. सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेत होत्या अशा महिलांचे पंधराशे रुपयाची हप्ते बंद करण्यात आले आहेत. 


👇👇👇

लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 


वरील पोस्टमध्ये लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज करण्याची पद्धत काय आहे तसेच या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि लाडकी बहिण योजनेसाठी काय पात्रता आवश्यक आहे हेही सांगितले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post