ज्येष्ठ कलावंत मानधन योजना
Kolhapur नमस्कार मित्रांनो राजेश्री शाहू महाराज जेष्ठ कलाकार मानधन योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार भजनी मंडळ यांना प्रति महिना पाच हजार रुपये मानधन देते. पात्र कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
ज्येष्ठ कलाकार मानधन योजना २०२५ – ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ कलाकार मानधन योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र कलाकारांना दरमहा ₹5000 मानधन दिले जाते.
योजनेची लाभार्थी पात्रता
1. ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे
2. दिव्यांकाना वयाची अट दहा वर्षांनी शिथिल करण्यात येत आहे
3. ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्षे आहे.
4. ज्यांनी साहित्य व कला क्षत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातली आहे
5. ज्या कलाकारांचे सर्व मार्गाने उत्पन्न 60 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे.
6 ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून होती मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार
👇👇👇
गावातील भजनी मंडळांना २ ५ हजार रुपयांचे अनुदान - ऑनलाइन अर्ज सुरु
📑 आवश्यक कागदपत्रे
- पत्त्याचा पुरावा (आधार / मतदान ओळखपत्र)
- जन्मतारीख पुरावा
- साहित्यिक/कलात्मक कार्याची माहिती व प्रमाणपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
🖊️ अर्ज प्रक्रिया
- आपले सरकार पोर्टल वर लॉगिन करा.
- "ज्येष्ठ कलाकार मानधन योजना" निवडा.
- अर्ज फॉर्म पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट करून अर्जाची प्रिंट घ्या.
🎯 योजनेचे महत्व
ही योजना महाराष्ट्रातील साहित्यिक, कलाकार, संगीतकार, नाटककार, चित्रकार इत्यादी ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक आधार व सन्मान देण्यासाठी राबवली जाते. आपल्या कलात्मक सेवेला राज्य सरकारकडून मान्यता मिळते.