लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र ladki bahin Yojana Maharashtra new update 



लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महिला सशक्तिकरणाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमधील राज्यातील 21 वर्षे ते 65 वर्षे या दरम्यानच्या सर्व महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत असे पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये महिलांना वितरित करण्यात आले आहेत. या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल? याची माहिती या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. 

सध्या निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेमुळे काही शासकीय योजना थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे 24 नोव्हेंबर नंतर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता येऊ शकतो. तसेच ज्या महिलांचे आत्तापर्यंत एकही हप्ता आला नाही अशा महिलांना 24 नोव्हेंबर नंतर कधीही एकूण 9000 रुपये येणार आहेत. ज्या महिलांचे आतापर्यंत पैसे आले नाहीत अशा महिलांनी घाबरण्याची गरज नाही त्यांचेही पैसे येणारच आहेत. परंतु सध्या आचारसंहितेमुळे ते आलेले नाहीत. 24 नोव्हेंबर नंतर कधीही त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील. ज्या महिलांच्या आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत त्यांना फक्त पुढील महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता मिळेल. 

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आता 2100 रुपये मिळतील अशी घोषणा केली होती. जर तेच सरकार पुन्हा निवडून आले तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपये वरून 2100 रुपये होऊ शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post