सातारा : सातारा जिल्ह्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सातारा यांच्याकडून विविध 26 व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संस्थेकडून प्रशिक्षण निवास भोजन व योगासनाचे शिक्षण संपूर्णपणे विनामूल्य असणार आहे. म्हणजेच प्रशिक्षणाची किंवा निवास व भोजनाची कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या संस्थेकडून शेळीपालन व्यवस्थापन, टू व्हीलर रिपेरिंग, बेसिक ड्रेस डिझाईनिंग, इमिटेशन ज्वेलरी, ब्युटी पार्लर व्यवस्थापन, बँक मित्र, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी अशा अनेक प्रकारचे व्यवसायाची प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रवेशासाठी पात्रता व अटी
सातारा जिल्ह्यातील कायम रहिवासी असणे आवश्यक
प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 45 दरम्यान असावे
शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास
व्यवसायाची प्राथमिक ज्ञान व व्यवसाय चालू करण्याकडे कल असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला, PAN card
दारिद्र्य रेषेखालील असल्यास आवश्यक तो दाखला
बँक पासबुक झेरॉक्स
प्रशिक्षणाचे स्थळ
171/1, रविवार पेठ, आयडीबीआय ॲनेक्स बिल्डिंग, शिवाजी सर्कल, पवई नाका, सातारा
फोन नंबर (02162) 226090, 226088
Email - idbirseti@idbi.co.in