प्रशिक्षणाचे स्थळ
171/1, रविवार पेठ, आयडीबीआय ॲनेक्स बिल्डिंग, शिवाजी सर्कल, पवई नाका, सातारा
फोन नंबर (02162) 226090, 226088
Email - idbirseti@idbi.co.in
सातारा जिल्ह्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सातारा यांच्याकडून विविध 26 व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संस्थेकडून प्रशिक्षण निवास भोजन व योगासनाचे शिक्षण संपूर्णपणे विनामूल्य असणार आहे. म्हणजेच प्रशिक्षणाची किंवा निवास व भोजनाची कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या संस्थेकडून शेळीपालन व्यवस्थापन, टू व्हीलर रिपेरिंग, बेसिक ड्रेस डिझाईनिंग, इमिटेशन ज्वेलरी, ब्युटी पार्लर व्यवस्थापन, बँक मित्र, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी अशा अनेक प्रकारचे व्यवसायाची प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रवेशासाठी पात्रता व अटी
सातारा जिल्ह्यातील कायम रहिवासी असणे आवश्यक
प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 45 दरम्यान असावे
शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास
व्यवसायाची प्राथमिक ज्ञान व व्यवसाय चालू करण्याकडे कल असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला, PAN card
दारिद्र्य रेषेखालील असल्यास आवश्यक तो दाखला
बँक पासबुक झेरॉक्स