उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढावा? | How to Get Income Certificate in Marathi

 

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढावा? | संपूर्ण माहिती 

नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो शैक्षणिक सवलती, शासकीय योजनांचा लाभ, शिष्यवृत्ती, आरक्षण, व विविध कर्ज योजनांसाठी आवश्यक असतो. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की 2025 मध्ये नवीन उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढावा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.


✅ उत्पन्नाचा दाखला कशासाठी लागतो?

  • उत्पन्नाचा दाखला विविध सरकारी व खासगी सेवांसाठी लागतो, जसे की:
  • शासकीय योजना (उदा. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना)
  • शैक्षणिक सवलती व EWS आरक्षण
  • सरकारी नोकरीसाठी लागणारे दस्तऐवज
  • शिष्यवृत्ती व शाळा/कॉलेज प्रवेश
  • कर्ज प्रकरणांमध्ये उत्पन्न सादर करताना


🖥️ उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया (Step-by-Step)

📍 टप्पा 1: महा-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा पोर्टलवर जाणे

🔗 अधिकृत वेबसाइट: https://aaplesarkar.mahaonline.gov.in

📍 टप्पा 2: आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करा किंवा नवीन खाते तयार करा.

📍 टप्पा 3:डॅशबोर्डवर "सर्व्हिसेस" मध्ये जा.

📍 टप्पा 4: Revenue Department अंतर्गत "Income Certificate" ही सेवा निवडा.

📍 टप्पा 5: अर्जाचा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

📍 टप्पा 2: ऑनलाईन फी भरून अर्ज सबमिट करा.


📋 लागणारी कागदपत्रे

दस्तऐवजाचे नाव

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • उत्पन्नाचे पुरावे (पगार पावती/फॉर्म १६/स्वयंघोषणा, तलाठी उत्पन्न दाखला)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाइल नंबर


⏳ प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ

सामान्यतः उत्पन्नाचा दाखला 7 ते 15 दिवसांच्या आत मिळतो. अर्जाची स्थिती तुम्ही "Track Application" या पर्यायातून तपासू शकता.


📥 उत्पन्नाचा दाखला PDF मध्ये डाउनलोड कसा करावा?

  • आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करा.
  • "Track Your Application" वर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक टाका.
  • मंजूरीनंतर, "Download Certificate" या लिंकवर क्लिक करा.


⚠️ महत्वाच्या टिप्स:

तुमचा मोबाइल नंबर आधारसोबत लिंक असावा.

स्वतःचा उत्पन्न नसल्यास, पालकांचा उत्पन्न दाखवा.

शाळा/कॉलेजसाठी अर्ज करताना अपडेटेड दाखला आवश्यक असतो.

Post a Comment

Previous Post Next Post