Krantijyoti SavitriBai Phule Balsangopan Yojana
नमस्कार मित्रांनो, बाल संगोपन योजनेचे नाव बदलून आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आले आहे. शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार या योजनेची संपूर्ण माहिती व अंमलबजावणीची प्रक्रिया शासन निर्णयामध्ये दिले आहे.बाल संगोपन योजनेसाठी कोण पात्र आहेत
अनाथ बालके,
एक पालक असलेली बालके (एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, अविवाहित मातृत्व, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे एक पालक असलेली बालके)
रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी, बालकामगार बालके
दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके.
बाल संगोपन योजनेत कोणता लाभ मिळतो
अंतर्गत प्रति बालक दरमहा रुपये 2250/- मिळतात या अनुदानातून बालकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण वैद्यकीय सुविधा इत्यादी सुविधा संबंधित कुटुंबामार्फत पुरवण्यात याव्यात.
बाल संगोपन योजनेचा कालावधी
बालकांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो
बाल संगोपन योजनेच्या निवडीसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्याचा रहिवासी दाखला
- लाभार्थ्याचे व पालकाचे आधार कार्ड छायांकित प्रत
- लाभार्थ्याची पालकाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्याबाबत तलाठी व तहसीलदार यांचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबास प्राधान्य देण्यात यावे.
- आईचा किंवा वडिलांचा मृत्यू दाखला
- बँक पासबुकची झेरॉक्स
लाभार्थ्याची निवड प्रक्रिया
स्वयंसेवी संस्थेतील सामाजिक कार्यकर्ता, महिला व बालविकास विभागाने अधिकृत केलेला अधिकारी किंवा कर्मचारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या बालकांचा संपूर्ण सर्वेक्षण करून पात्र ठरू शकणाऱ्या बालकांची यादी तयार करते
अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद या ठिकाणी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांना या योजनेची परिपूर्ण माहिती विचारून त्यांच्याजवळ अर्ज देऊ शकता, त्या पुढील कार्यवाहीसाठी योग्य कार्यालयात सादर करतील.