प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 – सातारा

Pradhanmantri Pik Vima Yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 – संपूर्ण माहिती | Satara | Pik Vima Yojana

🌾 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप हंगाम 2025 साठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.


👇👇👇

सातारा येथे विविध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण 

📌 योजनेचे वैशिष्ट्ये:

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सबसिडी दिली जाते.

विमा हप्ता नाममात्र ठेवण्यात आला आहे – उदा. भातसाठी केवळ ₹880 हप्ता भरावा लागतो.

सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी खुली योजना – कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी सहभागी होऊ शकतात.

विमा संरक्षण नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग, सतत पाऊस, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे होणाऱ्या नुकसानावर लागू.

विमा कंपनी – AIC (Agriculture Insurance Company of India Ltd.)


💡 विमा संरक्षण, हप्ता व विमा रक्कम (सातारा जिल्हा):

पिकाचे नाव विमा रक्कम (₹/हे.) हप्ता दर (%) हप्ता रक्कम (₹)

भात (लांब) ₹40,000 2% ₹800

भात (स्थानीक) ₹40,000 2% ₹800

नागळी ₹24,000 2% ₹480

वरई ₹24,000 2% ₹480

उडीद ₹24,000 2% ₹480

मूग ₹24,000 2% ₹480

सोयाबीन ₹30,000                        2% ₹600


📅 अर्ज कसा करावा?

शेतकरी बांधवांनी जवळच्या CSC केंद्र, बँक शाखा, आपल्या सेवा केंद्रात किंवा अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा:

🔗 https://pmfby.gov.in



👇👇👇

संजय गांधी निराधार पेन्शन योजना, माहिती  आणि अर्ज Pdf

📝 अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:

  • सातबारा उतारा
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • जमीनधारक असल्याचे प्रमाण


💡 टीप – बोगस कागदपत्रांच्या आधारे केलेल्या अर्जांना विमा लाभ नाकारला जाऊ शकतो.


ℹ️ अधिक माहिती साठी:

आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा विमा प्रतिनिधींशी संपर्क साधा.


✅ ही योजना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल आहे. कमी हप्त्यात अधिक विमा सुरक्षा घेऊन, आपल्या पिकांचे भविष्य सुरक्षित करा.

Post a Comment

Previous Post Next Post