संजय गांधी पेन्शन योजना असा करा अर्ज त्वरित मंजूर होईल, दरमहा २१०० रुपये पेन्शन

"Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025 माहिती


 संजय गांधी निराधार पेन्शन योजना अर्ज कसा करावा आणि या योजनेस कोण पात्र आहेत याची माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. संजय गांधी निराधार पेन्शन योजना महाराष्ट्रातील निराधार आणि गरजू व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये सध्या निराधार व्यक्तींना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत. या योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये होणार आहेत. अशी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिली होती. 


संजय गांधी निराधार पेन्शन योजना प्रत्येक गरजू व्यक्तींसाठी आहे. या योजनेतून दरमहा पंधराशे रुपये मिळतात. या योजनेस कोण पात्र आहेत माहिती खालील प्रमाणे आहे. 

या योजनेसाठी कोण पात्र आहे

संजय गांधी निराधार पेन्शन योजना अंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला लाभ घेऊ शकतात. या योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अंत अपंग अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटीत महिला, वैशाली व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला यांना आर्थिक सहाय्य केले जाते. 

  • अपंग व्यक्ती
  • मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती
  • अनाथ मुले 
  • निराधार महिला, निराधार विधवा, शेतमजूर महिला.
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
  • घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला.
  • अत्याचारीत महिला
  • वैशा व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
  • देवदासी
  • पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री 

आपल्या समाजामध्ये जवळपास अशा पात्र व्यक्ती असतील तर हे माहिती त्यांच्या पर्यंत पोहचावा आणि त्यांना चौकशी साठी तलाठी कार्यालयास भेट द्यायला सांगा. कारण अजूनही अनेक लोकांना या योजनेची पूर्ण माहिती नाही. या योजनेचा अर्ज सेतू केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा तहसीलदारकार्यालयात अर्ज करता येतो. 



अर्ज PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

  • वयाचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला 
  • रहिवाशी दाखला
  • रेशनकार्ड झेरॉक्स
  • आधार कार्ड
  • निवडणूक ओळखपत्र
  • बँक पासबुक

अर्ज मंजूर झाल्यावर किती पेन्शन मिळणार ?

1500 रुपये पेन्शन दरमहा मिळणार


अर्ज करण्याची पद्धत

अर्जदार निर्धारित केलेल्या नमुना एक मधील अर्जाच्या दोन प्रती तो राहत असलेल्या गावातील संबंधित तलाठ्याकडे अर्ज करेल.

अशा अर्जासोबत वर नमूद केलेल्या पात्रतेच्या अटीच्या पृष्ठयर्थ संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावीत. नमूद केलेल्या सक्षम प्राधिक कार्याकडून अशा प्रमाणपत्रांचा व कागदपत्रांचा दोन प्रती अर्जदाराने मिळवाव्यात. 

तलाठी यांनी प्राप्त अर्जाची व त्यासोबत कागदपत्राची शांती व पडताळणी करून अर्ज संबंधित तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याकडे पाठवावेत. 

Post a Comment

Previous Post Next Post