बांधकाम कामगारांना मिळणार दरवर्षी बारा हजार रुपये



बांधकाम कामगार योजना नमस्कार मित्रांनो आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पेन्शन मिळणार आहे. या योजनेची अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पण कामगारांना महिना 1000 ते 1500 रुपये एवढी पेन्शन येणार आहे. या योजनेसाठी काही अटी आहेत. बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना ची सविस्तर माहिती आपण येथे घेत आहोत. 


बांधकाम कामगार 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या कामगारांना बांधकाम कामगार असे म्हणतात. बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या सर्व कामगारांचा यामध्ये समावेश होतो. बांधकाम कामगार यांच्या कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये सामाजिक योजना,  आरोग्य योजना, आर्थिक योजना तसेच बांधकाम कामगारांना भांडी वाटप, पेटी वाटप आणि आरोग्य शिबिर अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. 

बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना 

आता शासनाकडून बांधकाम कामगार वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा एक हजार रुपये ते पंधराशे रुपये एवढे निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन मिळणार आहे. यासाठी बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार मंडळाकडे किमान दहा वर्षे नोंदणी केलेली असली पाहिजे. त्यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्ज केल्यानंतर पेन्शन मिळू शकते. 


पेन्शन योजनेची सविस्तर माहिती 


बांधकाम कामगार नोंदणी 



Post a Comment

Previous Post Next Post