बांधकाम कामगार पेन्शन योजना सर्व बांधकाम कामगार बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आता बांधकाम कामगारांना वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर प्रतिमा हा एक हजार रुपये म्हणजेच बारा हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळणार आहे. या योजनेचा अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी असणाऱ्या बांधकाम कामगारांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतन मिळणार आहे. यासाठी योजनेचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे
✅ 1. पात्रता निकष:
(अ) वयोमर्यादा आणि नोंदणी कालावधी:
60 वर्षे पूर्ण केलेले बांधकाम कामगार
सतत किमान 10 वर्षे मंडळाकडे नोंदणी असलेले
(ब) पती-पत्नी दोघेही कामगार असतील तर:
स्वतंत्रपणे निवृत्तीवेतन मिळू शकते
(क) पती/पत्नीच्या मृत्यूनंतर:
जिवंत असलेल्या जोडीदारास निवृत्तीवेतनाचा लाभ
मात्र, पती/पत्नी जर आधीच ‘सिर’ योजनेंतर्गत निवृत्तीवेतन घेत असतील, तर दुसऱ्यास निवृत्तीवेतन लाभ मिळणार नाही.
(ड) खालील योजनांतील लाभार्थी पात्र नाहीत:
कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC - 1948)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना (EPF - 1952)
💰 2. निवृत्तीवेतन रक्कम आणि गणना:
नोंदणी कालावधी निवृत्तीवेतनाचे प्रमाण दर वर्षी रक्कम
10 वर्षे 50% ₹6,000/-
15 वर्षे 75% ₹9,000/-
20 वर्षे 100% ₹12,000/-
कामगार उपकराच्या स्थितीवर आधारित रक्कम कमी-जास्त होऊ शकते.
📝 3. अर्ज प्रक्रिया:
(अ) अर्ज डाउनलोड:
संकेतस्थळ: 👉 https://mahabocw.in
अर्ज फॉर्म: प्रपत्र-अ
(ब) अर्ज कोठे जमा करायचा:
आपल्या जिल्ह्यातील कामगार सहायता केंद्र/WFC ऑफिस (कामगार उपायुक्त / सहाय्यक अधिकारी यांच्याकडे)
(क) आवश्यक कागदपत्रे:
पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड छायाप्रत)
जन्मतारखेचा पुरावा (जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
बँक पासबुकची छायाप्रत
✅ 4. पुढील टप्पे:
(अ) कागदपत्रांची पडताळणी:
जिल्हा प्रभारी अधिकारी अर्ज तपासून “प्रपत्र-ब” (शिफारस प्रमाणपत्र) तयार करतो
(ब) एकापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये नोंदणी असल्यास:
“प्रपत्र-क” (वर्षानुसार नोंदणी प्रमाणपत्र) जमा करणे आवश्यक
(क) अंतिम मान्यता:
मुख्य कार्यकारी अधिकारी मंडळामार्फत "निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र" (प्रपत्र-ड) दिले जाते
(ड) निवृत्ती दिनांक:
प्रमाणपत्राच्या दिनांकानुसार निवृत्ती दिनांक निश्चित होतो
🔁 5. दरवर्षी हयातीचा दाखला आवश्यक:
नोव्हेंबर महिन्यात
प्रपत्र-इ सादर करणे गरजेचे
यासाठी कामगाराने स्वतः उपस्थित राहून WFC कार्यालयात हयातीचा दाखला सादर करावा
👇👇👇
बांधकाम कामगार नोंदणी फक्त १ रुपयांमध्ये करा