पीएम किसान योजना
केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना राबवली जाते या योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता विसावा हप्ता कधी मिळेल या प्रतीक्षेत सर्व शेतकरी आहेत. शेतीतील पेरणी आणि इतर कामे सुरू आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा येणारा हप्ता महत्त्वाचा आहे. पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल याची अधिकृत घोषणा शासनामार्फत अद्याप करण्यात आली नाही परंतु शेतकऱ्यांना 31 जुलै पूर्वीच कधीही हप्ता मिळेल अशी माहिती सांगण्यात येत आहे.
पी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. दोन हजार रुपये चा हप्ता प्रत्येक चार महिन्यानंतर दिला जातो. असे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता दिनांक 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी मिळालेला होता. त्यामुळे. शेतकऱ्यांना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी इ के वाय सी, आणि फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे.
फार्मर आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा
पीएम किसान योजना अधिकृत वेबसाईट