PMFME योजना अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगांना 35% अनुदान – अर्ज कसा करावा?
PMFME (Prime Minister Formalisation of Micro Food Processing Enterprises) योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील लघु खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगांना 35% पर्यंत अनुदान दिले जाते. कृषीमालावर आधारित कोणताही प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी किंवा आधीपासून अस्तित्वात असलेला उद्योग वाढवण्यासाठी (विस्तारीकरण) हे अनुदान मिळू शकते.
PMFME अंतर्गत मान्यताप्राप्त खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगांची यादी
योजनेअंतर्गत खालील उद्योगांसाठी अर्ज करता येईल:
बेकरी उद्योग
केळीचे चिप्स निर्मिती
बिस्किट निर्मिती
पोहा निर्मिती
काजू प्रक्रिया
ब्रेड/टोस्ट निर्मिती
केक निर्मिती
चॉकलेट निर्मिती
कोकोनट मिल्क पावडर निर्मिती
कस्टर्ड पावडर निर्मिती
दलीया निर्मिती
डाळ मिल
एनर्जी ड्रिंक निर्मिती
पिठाची गिरणी
फ्रेंच फ्राय निर्मिती
फ्रूट ज्यूस निर्मिती
अद्रक-लसूण पेस्ट निर्मिती
ग्रेप वाईन निर्मिती
तेलघाना (शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी)
हिंग निर्मिती
मध प्रक्रिया
बर्फाचे तुकडे निर्मिती
आइसक्रिम कोन निर्मिती
आयोडिनयुक्त मिठ निर्मिती
जैम व जेली निर्मिती
लिंबू शरबत निर्मिती
नूडल्स/शेवई निर्मिती
सीलबंद पाणी उद्योग
पाम तेल निर्मिती
पनीर/चिज निर्मिती
पापड निर्मिती
पास्ता निर्मिती
लोणचे निर्मिती
आलू चिप्स निर्मिती
राईस ब्रान तेल निर्मिती
सुगंधित सुपारी निर्मिती
सोया चन्क निर्मिती
सोया सॉस निर्मिती
हळद/मसाले निर्मिती
शुगर कँडी निर्मिती
सोयाबीन पनीर व खरमुरे निर्मिती
इमली पल्प निर्मिती
टोमॅटो प्रोसेसिंग
टूटी-फ्रुटी निर्मिती
व्हिनेगर निर्मित
कृषीमालावर आधारित कोणताही प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो.
अनुदानाची वैशिष्ट्ये
एकूण प्रकल्प खर्चाच्या 35% पर्यंत अनुदान
कमाल अनुदान मर्यादा ठरवलेली (उद्योगाच्या प्रकारानुसार)
आधीपासून चालू असलेल्या उद्योगाच्या विस्तारीकरणासाठी देखील अर्ज करता येतो
उद्योग स्थापनेसाठी व कर्ज प्रस्ताव तयार करण्यासाठी संसाधन व्यक्तींची मदत उपलब्ध
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड
पॅनकार्ड
बँक पासबुक
व्यवसाय परवाना / Udyam नोंदणी
कोटेशन / प्रकल्प अहवाल
अर्ज प्रक्रिया
संसाधन व्यक्ती कडे आपली कागदपत्रे जमा करा
बँकेसाठी प्रस्ताव तयार केला जाईल
बँकेकडून कर्ज मंजुरी
उद्योग स्थापन
अनुदानाचा प्रस्ताव तयार करून रक्कम तुमच्या खात्यात जमा
✅ टीप – जर तुमचा उद्योग आधीपासून चालू असेल, तर त्याच्या विस्तारीकरणासाठी अर्ज करून अनुदान मिळवू शकता.