पीएम किसान योजना प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात या योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी जमा झाला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे का? मिळाला नसेल तर काय करावे लागेल? याची माहिती येथे आपण घेणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा.
पी एम किसान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात, दोन हजार रुपयाचे समान हफ्ते दिले जातात. आता शेतकऱ्यांना विसावा हप्ता मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे त्यांच्या अभिनंदन, जे शेतकरी पात्र असूनही बँक खात्यामध्ये हप्ता आला नाही, त्यांना पुढील एक दोन दिवसांमध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता मिळेल. त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही.
👇👇
पीएम किसान योजना स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीएम किसान योजना केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांना हा आता मिळणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी तसेच फार्मर आयडी सुद्धा काढून घ्यावा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नाही त्यांनाही पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही.
