घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती



नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी घरकुल योजनेचे कोणकोणते प्रकार आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे. 

१. प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण - या योजना शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेसाठी आहे या योजनेचे काही निकष आहेत. या निकषांमध्ये तुम्ही बसत असल्यास या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. 

२. रमाई आवास योजना - ही योजना अनुसूचित जाती व जमातीतील लोकांसाठी आहे. या योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती व जमाती मधील लोक या घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकतात. 

३. मोदी आवास योजना -  या घरकुल योजना अंतर्गत ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय समाजातील लोक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. या तिन्ही घरकुल योजना साठी शासनाचे काही नियम व अटी आहेत. शासनाच्या नियम अटीं मध्ये बसत असल्यास घरकुल योजनेसाठी अर्ज करता येतो. 

घरकुल योजनांसाठी अर्ज कसा करावा 

घरकुल योजनेचा अर्ज तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज करावा लागतो. तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक यांच्याकडे करावा लागतो. 

घरकुल साठी ग्रामसेवक यच्याकडे अर्ज केल्यानंतर या अर्जावर निर्णय पंचायत समिती कार्यालय मध्ये होतो. यासाठी ग्रामपंचायत मार्फत सर्वे केला जातो. ग्रामपंचायत अधिकारी तसेच कर्मचारी येऊन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याची पाहणी करतात अर्ज करणारा लाभार्थी  खरेच गरज आहे का? याची पाहणी करतात लाभार्थी गरज असल्यास सर्वे मध्ये नावे पुढे दिली जातात. आणि अशा लोकांनाच घरकुल मंजूर होते. 


घरकुल योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाला भेट द्या. 


मोदी दिवस योजना अर्ज पीडीएफ 


प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अर्ज पीडीएफ


रमाई आवास घरकुल योजना अर्ज पीडीएफ 




 

Post a Comment

Previous Post Next Post