जिल्हा परिषद योजनांसाठी आज अर्ज करण्याची शेवटची तारीख, त्वरित अर्ज करा

 


नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद योजना, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, कडबा कुट्टी पॉवर विडर, विद्युत पंप, अशा अनेक योजनांसाठी जिल्हा परिषद सातारा मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आज 30 जून आज जिल्हा परिषद योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. ज्या लोकांना अजून अर्ज करायचे आहेत त्यांनी त्वरित अर्ज करावा. 


जिल्हा परिषद सातारा  जिल्हा परिषद सातारा मार्फत अनेक योजना जसे की कृषी योजना, समाज कल्याण योजना, महिला व बालकल्याण विभाग योजना, आणि पशुसंवर्धन विभाग योजना या सर्व योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज गेल्या एक महिन्यापासून सुरू आहेत. आज ३० जून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ज्या लोकांना अर्ज करायचे राहिले आहे त्यांनी आज रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज पूर्ण करून घ्यावा. या अगोदर मुदतवाढ झाली असल्याने आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, हे स्पष्ट होते.

👇👇👇

या योजनेसाठी अर्ज सुरू आहेत 


👇👇👇

जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट पहा 


मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्यांचे अर्ज पूर्वी ऑफलाइन होते. म्हणजे यापूर्वी पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन लेखी अर्ज द्यावे लागत होते. परंतु आता जिल्हा परिषदेच्या https://www.zpsatarascheme.com/ या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतात. प्रत्येक योजनेसाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत याचीही माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आले आहे. 


मित्रांनो, ही माहिती शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना जिल्हा परिषद योजनांचा लाभ मिळेल. धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post